Ad will apear here
Next
निळा म्हणे...!


महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.

संत निळोबा राययांचा जन्म अहमदनगरच्या कुळकर्णी कुटुंबातला. त्यांनी भक्तिपंथाचे १२००हून अधिक अभंग रचले. शरीर थकेपर्यंत प्रवचने-कीर्तने केली; पण त्यांच्याविषयी फारच थोडी माहिती मिळते व जी माहिती आहे ती परस्परविरुद्धसुद्धा आहे.



निळोबांवर संत तुकारामांच्या रचनांचा प्रभाव होता; मात्र त्यांची तुकारामांशी भेट मात्र होऊ शकली नाही, असे म्हटले जाते. त्यांच्या अभंगांच्या अखेरीस ‘निळा म्हणे’ असा उल्लेख आढळतो.

निळोबांच्या रचना भावपूर्ण व रसाळही आहेत. त्यांच्या अभंगांत विठ्ठलभक्तीबरोबरच श्रीकृष्ण स्तुती ठायी ठायी आढळते. त्यांनी कृष्ण चरित्रसुद्धा लिहिले.

निळोबाराय यांचे काही अभंग मला मिळाले आहेत; पण त्यांच्या रचनाकाराबद्दल ठोक सत्य माहिती न मिळाल्याने ते इथे देत नाही; मात्र विकिपीडियावर त्यातील काही उपलब्ध आहेत.

- भारतकुमार राऊत


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RUJFCW
Similar Posts
राही मतवाले... तलत महमूद ‘इतना ना मुझ से तू प्यार बढा, की मैं एक बादल आवारा’ अशा गाण्यांनी लाखो प्रेमी जीवांच्या मनाची भावना स्वरबद्ध करणारे गायक तलत महमूद यांचा आज (२४ फेब्रुवारी) जन्मदिन. त्यांच्या तरल स्मृतींना सलाम!
एका जनार्दनी...! सोळाव्या शतकात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील रंजल्या-गांजल्या व निरक्षरतेने पिडलेल्या जनतेला उपदेश करण्यासाठी संस्कृतप्रचुर व अलंकारिक भाषेचा त्याग करून सामान्यांच्या भाषेत गहन तत्त्वज्ञान सांगणारे विद्वान संत-कवी एकनाथ यांची आज (२५ फेब्रुवारी) पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...
ती ‘फुलराणी’ प्रिय भक्ती, तू न सांगता, न कळवता अचानक जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेऊन कायमची निघून गेलीस त्या घटनेला आज (१२ फेब्रुवारी) २१ वर्षे झाली. या काळात जग खूप बदललं. माणसं बदलली. बदलल्या नाहीत फक्त तुझ्या आठवणी... तुझं स्टेजवरचं खळाळतं हसणं आणि प्रत्यक्षातलं मुसमुसून रडणं! तुझ्या असंख्य आठवणींपैकी काही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language